पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा "बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पुजन समारंभ संपन्न
 
                                    
                                प्रतिनिधी :-अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा ४४ वा "बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पुजन समारंभ " दि.०६ नोव्हेंबर २०२४ रोजी अनुक्रमे स.०९.३५ वा. व स.१०.५५ वा. कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनिलराव कदम यांचे अध्यक्षतेखाली व अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संचालक सुरेशराव गणेशराव आहेर व त्यांच्या सुविद्य पत्नी सारदा आहेर, व संचालक शंकरराव तुकारामजी इंगोले व त्यांच्या सुविद्य पत्नी ललीता इंगोले आणि सभासद तुकाराम उत्तमराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी मनिषा चव्हाण, संचालिका या उभयंतांचे शुभहस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी केले. प्रास्ताविकात गळीत हंगाम २०२४-२५ साठीचे सर्व तयारीबाबत माहीती दिली.
कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांनी मार्गदर्शन करतांना कारखान्याचे सन्मा. सभासदांनी यावर्षी ६.०० लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला द्यावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष महोदयांनी केले. तसेच ऊसतोड करण्यासाठी कामगारांची कमतरता भासत असल्याने या हंगामात ऊसतोडणी यंत्राव्दारे जास्तीत-जास्त ऊसाची तोडणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष महोदयांनी नमुद केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनिलराव कदम यांनी कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा तसेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सन्मा. सभासदांसमोर मांडला. तसेच सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात सर्व सन्मा. सभासदांना आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला द्यावा अशी विनंती केली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी बंधु, तोड / वाहतुक ठेकेदार, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन कारखान्याचे शेती व ऊसविकास उपसमिती अध्यक्ष शहाजीराव देसाई यांनी केले.
 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
							                 
							                 
							                 
                                     
                                     
                                     
                                     
							                 
							                 
                     
                                                                 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            