गुरुदेव प्रचारिका सुश्री गंगा काकडे स्व.ना.भ. कापकर पुरस्काराने सन्मानित
तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर येथिल रहिवासी असलेल्या कापकर परिवारातर्फे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्व. ना.भ.कापकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आदर्श प्रचारिका सुश्री गंगा भानुदास काकडे यांना स्व. ना.भ. कापकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरवर्षी महिला दिनी समाजातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कर्तबगार महिलेचा कापकर परिवारातर्फे सन्मान करण्यात येतो 2022 ला मंगेशी मुन, 2023 ला माधवी चौधरी, 2024 ला डॉ. उषा फाले, 2025 ला कविता येनुरकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच यावर्षी महाराष्ट्रभर मुलींच्या शिबिराला मार्गदर्शन, प्रबोधन करणाऱ्या आदर्श प्रचारिका सुश्री गंगा काकडे अड्याळ टेकडी रा. पावन भूमी ता. भिवापूर जिल्हा नागपूर यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि समाजसेवेसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजन सतीश मिसाळ माजी आरोग्य सभापती नगरपरिषद वर्धा ह्या होत्या तर प्रमुख अतिथी प्रा. सचिन सावरकर, भाऊसाहेब थुटे सप्त खंजिरी वादक , मुरलीधर बेलखोडे अध्यक्ष निसर्ग सेवा समिती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विनोद वाघ यांनी समर्पक गीत सादर केले.कार्यक्रमाचे आयोजन अल्लीपूर येथील कापकर परिवार यांनी केले होते. संचालन किरण पट्टेवार यांनी तर आभार प्रदर्शन किशोर कापकर यांनी मानले. कार्यक्रमाकरिता यशवंत नलोडे, एड. नारायण भोयर,राजेंद्र मिरापूरकर,सुरेखा थुटे गुणवंत साळवे, अनिल वरखडे प्रवीण महाराज देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक बाळकृष्ण हांडे यांनी राष्ट्रवंदना घेतली कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी गजानन कापकर, विशाखा कापकर,स्मिता दराडे, उमेश कापकर नंदू वानखडे,प्राप्ती कापकर व अंकुश कांचनपुरे यांनी सहकार्य केले.