*इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन*

Thu 26-Nov-2026,10:57 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपूर

 

 इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे दिनांक 26 नोव्हेंबर गुरुवार रोजी संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ अर्चना मुडे तर प्रमुख अतिथी संस्थासचिव श्री योगेश खोडे, पी एस आय वर्षा तांदूकर, ठाणेदार संगीता हेलोंडे उपस्थित होत्या तसेच विज्ञान विभाग प्रमुख डॉ.नीलम खोडे , शाळेचे पर्यवेक्षक नरेश येडे, ज्येष्ठ शिक्षक शरद कारवटकर , सांस्कृतिक विभागप्रमुख हेमंतकुमार पारसडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

   संविधान दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. भारत एकसंघ व अखंड आहेत याचे संपूर्ण श्रेय भारतीय संविधानाचे आहेत असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ अर्चना मुडे यांनी व्यक्त केले. राज्यकारभार कसा करावा या संदर्भातला लिखित दस्तऐवज म्हणजे संविधान होय व या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकांचे अधिकार व कर्तव्य नमूद केलेले आहेत. जगातील सर्वोत्तम संविधान म्हणून भारतीय संविधानाकडे आशेने पाहिले जाते असे मत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय योगेश खोडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांमध्ये भारतीय संविधानाचे उद्देश पत्रिकेचे वाचन पी एस आय वर्षा तांदूरकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मिलिंद नगराळे व चंद्रशेखर रेवतकर तर आभार किशोर शेंद्रे व अनिल चांभारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.