विज्युक्टा वर्धा जिल्ह्याच्यावतीने नवनियुक्त नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांचा सत्कार
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा :विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विज्युक्टा) वर्धा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने वर्धा महानगरपालिकेचे नवनियुक्त नगराध्यक्ष श्री. सुधीर पांगुळ यांचा नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी विज्युक्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील आरोग्य व शिक्षण या विषयांवर चर्चा केली. शहरातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या समस्या जाणून घेऊन शैक्षणिक धोरण राबवावे, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यास प्रतिसाद देताना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी आरोग्य व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांना प्राधान्य देऊन आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल तसेच शहराचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे आश्वासन विज्युक्टा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी पराग भोयर,पंकज इंगोले, शशांक विरखडे, जिल्हा कार्यकारिणीतील केंद्रीय सदस्य प्रा. राजेश बाळसराफ, प्रा. अभिजित डाखोरे, संघटक प्रा. डॉ. अनिस बेग, प्रा. किशोर पिंपळे, सहसचिव प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. अरविंद राठोड, प्रा. सुनील भोयर, सहसचिव प्रा. दुर्योधन नौकरकर, प्रा. प्रवीण ठाकरे यांच्यासह विज्युक्टाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.