स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल जयंती निमित्त प्रबोधनपर व्यसनमुक्ती उपक्रम

Tue 06-Jan-2026,06:59 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : हिंगोली येथे १९४२,'चले जावो, आंदोलनाचे सेनानी, स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी, मराठवाडा मुक्ती संग्रामातील अग्रणी स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या १०३ व्या जयंती निमित्त दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत, हिंगोली येथील मातोश्री गंगादेवी देवडा निवासी विद्यालयत तंबाखू-तंबाखुजन्य पदार्थ दुष्परिणामांबाबत व्यसनमुक्ती प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन दि. ७ बुधवारी करण्यात आली आहे. 

      नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नशामुक्त भारत अभियान समितीचे पदाधिकारी श्याम सोळंके, मुख्याध्यापक पिंगळकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल आदींची उपस्थिती राहणार आहे.