पिपरिया भाजपाकडून स्व. धन्नुलाल दमाहे यांना श्रद्धांजली

Sun 28-Dec-2025,05:16 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा

सालेकसा --भाजपाचे ज्येष्ठ नेते धन्नुलाल केशरी दमाहे (वय ८५ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी स्थानिक मोक्षधाम, गल्लाटोला (पिपरिया) येथील नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, आपल्या मधून एक कर्तव्यनिष्ठ व कर्मठ नेते गेल्याने पिपरिया भाजपातर्फे शक्तिकेंद्र प्रमुख गुणाराम मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली, अध्यक्ष रामेश्वर लिल्हारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका भाजपाचे उपाध्यक्ष सरोज परतेती यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २८ डिसेंबर, रविवार रोजी शिवगड मंदिर सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करून स्व. धन्नुलाल दमाहे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

         या वेळी पिपरिया भाजपाचे ज्येष्ठ नेते सर्वश्री त्रिभुवन दमाहे, सचिव मुन्नालाल कटरे, माजी ग्रामपंचायत सदस्य शेरसिंग मच्छिरके, भरतलाल भुरकुडे, श्रीलाल लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य राजाराम धामडे, बूथ प्रमुख संदीप चौरागडे, चंदू पाचे, आदिवासी सहकारी संस्थेचे संचालक बिसराम नागपुरे, माजी संचालक प्रभुदयाल वडगाये, महेश कुंभरे, धनराज बरेकर, सुखराम लिल्हारे, हेमंत नेवारे तसेच हरिचंद उईके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.