पत्रकार रवि कुंटे यांची ॲक्टिव्ह मराठी न्यूज राज्यव्यापी सामाजिक चॅनल पेपर अंक करीता उपसंपादक पदावर नियुक्ती

प्रतिनिधी- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत तालुक्यातील गिरगाव येथील मा रवि कुंटे प्रतिनिधी मागील गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी अगदी कमी वेळात अग्रेसर राहून सर्व प्रश्नांचा भडीमार आपल्या सक्षम लेखणीच्या व मिडिया समूहाशी संलग्न राहून सर्व संबंधित सामान्य जनतेचे व विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य शेती विषयक सर्व बाबींवर दखल घेऊन प्रश्न मार्गी लावत मिडिया समूहाच्या माध्यमातून काही संबंधीत प्रश्न मार्गी लावल्या कारणाने मुख्य संपादक उमेश साठे सर व सीनियर सर्व कार्यकारणी संपादन मंडळांनी रवि कुंटे यांना स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संधीला म्हणजे 15 ऑगस्ट 2025 रोजी उपसंपादक पदावर नियुक्ती करण्यात आली.यावेळी, सन्मानीय मुख्य संपादक उमेश साठे सर, लोणीकंद पोलीस स्टेशनचे सपोनि सन्मानित दिलीप पालवे . शिक्रापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्मानित पानसरे व तसेच वरिष्ठ पदाधिकारी प्रमोद शितोळे,राज्याचे वरीष्ठ पदाधिकारी मदनकर. कार्यकारी संपादक श्रीकांत बाराहाते सर,नऊ वर्षा पासून रुजू असलेल्या .सुनीता दुबळे, जया रोकडे, हेमलता मातंगी रासकर होले तर ज्यांनी उद्घाटन कार्यक्रमाची जबाबदारी संपूर्णपणे स्विकारून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला त्या म्हणजे मोनिका वाघ या सर्वांच्या हस्ते विविध समुह राज्यातील सर्व प्रतिनिधी पत्रकार बंधुं भगिनींना आयडी कार्ड व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.