रोठा ग्रामपंचायतीच्या आमसभेत ग्रामस्थांचा संताप; धक्काबुक्कीचा आरोप

Wed 09-Sep-2026,10:12 PM IST -07:00
Beach Activities

रोठा ग्रामपंचायतीच्या आमसभेत ग्रामस्थांचा संताप; धक्काबुक्कीचा आरोप

 वर्धा : प्रतिनिधी इरशाद शहा

रोठा गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या नागठाणा येथे आज, दि. 7 सप्टेंबर रोजी ग्रामसभा (आमसभा) आयोजित करण्यात आली होती. या सभेत गावकऱ्यांनी गावातील विविध समस्या व प्रश्न उपस्थित करून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच संबंधित वॉर्ड सदस्यांकडे उत्तरे मागितली.

मात्र, ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

सभा सुरू असतानाच सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी ग्रामस्थांनी सभा संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली. मात्र, बाहेर जाण्याच्या प्रयत्नात ग्रामस्थांसोबत धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला.

यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सरपंच व सदस्यांना बाहेर जाण्यापासून रोखले. ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तर देण्याची मागणी केली आहे.