जातीवादी वृत्तीच्या निषेधार्थ भिम शक्ती संघटनेतर्फे वर्ध्यात आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

Wed 19-Aug-2026,12:19 AM IST -07:00
Beach Activities

जातीवादी वृत्तीच्या निषेधार्थ भिम शक्ती संघटनेतर्फे वर्ध्यात आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन*

वर्धा:प्रतिनिधि युसूफ पठाण

दिल्ली येथील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खगे यांच्या सभेनंतर काही जातीयवादी संघटनांनी गोमूत्र शिंपडून परिसर 'शुद्ध' करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा भिम शक्ती संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

या जातीयवादी व मनुवादी वृत्तीचा जाहीर निषेध नोंदवत भिम शक्ती संघटना वर्धा जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 

त्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मुंडन आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचले. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आले आहे.

 हे निवेदन भिम शक्ती संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष रणजितदादा धोंगडे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

प्रमुख मागण्या:

जातीयवादी व मनुवादी कृत्य करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.

निषेध निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली असून, प्रशासनाने हे निवेदन तात्काळ राष्ट्रपतींकडे पाठवून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.