अल्लीपूरकरांच्या सामूहिक संघर्षाला अखेर यश अल्लीपूरकरांनी दाखवून दिले... एकजुटीने लढा दिला तर मागणी पूर्ण होते!' - सचिन पारसडे जिल्हाकार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार

Thu 24-Sep-2026,08:23 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर

 

 अल्लीपूर व परिसरातील नागरिकांना महसूल व प्रशासकीय कामांसाठी वारंवार हिंगणघाट येथे जावे लागू नये, नागरिकांची होणारी गैरसोय कमी व्हावी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. या मागणीसाठी महाविकास आघाडी आणि अल्लीपूर गावातील नागरिकांनी एकजुटीने केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे.

ही केवळ एका कार्यालयाची मागणी नव्हती, तर अल्लीपूर आणि परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणींशी संबंधित असलेला महत्त्वाचा प्रश्न होता. नागरिकांना विविध महसूल कामांसाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून दूरवर जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा मिळाव्यात, या प्रमुख मागणीसाठी माहाविकास आघाडीने व नागरिकांना सोबत घेत सातत्याने आवाज उठविला.

 

दिनांक 12 सप्टेंबर 2024रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाकार्याध्यक्ष सचिन पारसडे यांच्या नेतृत्वात अल्लीपूर गावातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनातून अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली. नागरिकांची गैरसोय, प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ आणि स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या शासकीय सुविधांची गरज प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

मात्र निवेदन देऊनही प्रश्नाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने नागरिकांचा असंतोष वाढत गेला. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केवळ निवेदन देऊन शांत न बसता आंदोलनाचा मार्ग

करण्यात आले. प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनातून एक स्पष्ट संदेश देण्यात आला की अल्लीपूरकरांना त्यांच्या हक्काच्या प्रशासकीय सुविधा स्थानिक पातळीवर मिळाल्याच पाहिजेत.'

नागरिकांच्या मागणीची तीव्रता आणि गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाने अल्लीपूरच्या प्रश्नाला व्यापक स्वरूप दिले. आंदोलनानंतरही मागणीचा पाठपुरावा सुरूच ठेवण्यात आला. प्रशासन, संबंधित अधिकारी आणि शासनस्तरावर वेळोवेळी मागणी मांडण्यात आली. निवेदन, आंदोलन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा; अखेर मागणीला येश मिळाले..

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अल्लीपूर गावातील नागरिकांच्या मागणीला सातत्याने पाठबळ दिले, तर अल्लीपूर गावातील नागरिकांनीही या लढ्यात खंबीरपणे सहभाग घेतला. त्यामुळे हा प्रश्न केवळ राजकीय मागणी न राहता संपूर्ण अल्लीपूर गावाचा सामूहिक प्रश्न बनला. अखेर या सामूहिक प्रयत्नांना यश आले असून अल्लीपूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी पूर्ण झाली आहे.

या निर्णयामुळे अल्लीपूर गावासह परिसरातील नागरिकांना महसूल व विविध प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होणार असून स्थानिक पातळीवर शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध होनार

आहे. या विजयाचे श्रेय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच अल्लीपूर् व परिसरातील प्रत्येक त्या नागरिकाला जाते, ज्यांनी या मागणीसाठी आवाज उठविला आणि संघर्षात सहभाग घेतला. दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी निवेदन देऊन आम्ही हा प्रश्न प्रशासनासमोर मांडला. मात्र केवळ निवेदन देऊन नागरिकांचा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात आल्यानंतर 3जून 2025रोजी तलाठी कार्यालय' अल्लिपूर् येथे आंदोलन केले. प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. त्यानंतरही प्रशासन आणि शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.

नागरिकांच्या हक्काचा प्रश्न असेल तर तो कितीही मोठा असो, कितीही वेळ लागो; संघर्ष थांबवायचा नाही, ही आमची भूमिका आहे. अल्लिपूरकरांनी एकजूट दाखवली, म्हणून आज त्यांच्या मागणीला यश मिळाले आहे. हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून हा विजय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अल्लिपूर गावातील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचा आहे. नागरिकांनी विश्वास दाखवला आणि आम्ही त्या विश्वासाला संघर्षातून उत्तर दिले. यापुढेही अल्लिपूर गाव आणि परिसरातील नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आम्ही शांत बसणार नाही. नागरिकांचा प्रश्न असेल, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज रस्त्यावरही दिसेल आणि प्रशासनाच्या दारातही घुमेल.'