अल्लीपूर येथे स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
अल्लीपूर येथे स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
अल्लिपूर येथील स्थानिक बसस्थानक चौकातील साई गजानन मंदिरात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास काँग्रेसचे माजी सरपंच प्रभाकर फटिंग, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष (शरद पवार गट) सचिन पारसडे, माजी सरपंच गजानन नरड, शिवराया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सेलकर, बालू महाजन, बालू घुसे, गोपाल गिरडे, गोपाल मेघरे, पत्रकार सुनील हिंगे, संदीप नरड यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मौन पाळत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.