राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुका द्वारे फळ वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम

प्रतिनिधी गुलशन बनोठे सालेकसा
सालेकसा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन मंत्री विकासशील नेतृत्व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे रुग्णांना फळ वितरण तसेच ग्रामीण रुग्णालयात परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा चे तालुकाध्यक्ष डॉ.अजय उमाटे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. ह्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, जिल्हा महासचिव डॉ.हिरालाल साठवणे,तालुका युवक अध्यक्ष बाजीराव तरोने, महिला तालुकाध्यक्ष गीता चौधरी, सालेकसा शहर अध्यक्ष सुनीता थेर, ग्रामीण रुग्णालय सालेकसा चे दंतशल्य चिकित्सक आर.आर.त्रिपाठी,डॉक्टर पायल मॅडम,लिपीक एस.एल.होळकर,माजी जि.प.सदस्य बिसराम चर्जे, वरिष्ठ कार्यकर्ते केवलराम जी भैसारे, सुरेश अग्रवाल,जियालाल बघेले, सीता अवस्थी, उषा वऱ्हाडे, संतोषी चुटे,ममता बघेले, योगेश असाटी, ओमप्रकाश लिल्हारे,सुभाष बहेकार, बबलू मानकर,राहुलदेव साठवणे, गगन छाबडा, अंकित मिश्रा, मिथुन गजभिये, मोतीलाल मेश्राम ,विरेंद्र त्रिपाठी ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथील सर्व परिचारिका, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.