डॉ. आंबेडकर वॉर्डात विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Fri 06-Mar-2026,01:34 AM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.

बल्लारपूर : शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्ड परिसरात आज सकाळी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. श्रावणी सुरज केशकर (वय २९ वर्ष) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास मृत महिलेचा पुतण्या काही कामानिमित्त घरी गेला असता, श्रावणी हिने घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ही बाब त्याने तत्काळ घरच्यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आले.

माहिती मिळताच बिपिन इंगळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविला.

श्रावणी केशकर हिचे सुमारे सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाले होते.

तिला पाच वर्षांचा एक मुलगा आहे. आज सकाळी पती-पत्नीने एकत्र चहा घेतल्याची माहिती समोर आली आहे. पती रंग खेळण्याच्या तयारीत असताना ही घटना उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर प्रकरणाचा प्राथमिक तपास बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा संदीप दुर्योधन व महिला पोलीस अंमलदार रुपाली माथनकर करीत आहेत.

दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून परिसरात घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.