सावंगी मेघे पोलिसांची मोठी कारवाईअवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
जिल्हा विशेष प्रतिनिधी युसूफ पठान
वर्धा:वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलिसांनी अवैध गौण खनिज (रेती) चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवत, पालोती रोडवर मध्यरात्री अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. या कारवाईत ७ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक ०६/०१/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत असताना, पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास मौजा पालोती रोडने सावंगीच्या दिशेने एक लाल रंगाचा महिंद्रा ट्रॅक्टर (क्र. MH 32 AH 2357) विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह येताना दिसला. संशय आल्यावरून पोलिसांनी पंचांसमक्ष ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता, त्यात सुमारे १ ब्रास (१०० फूट) काळी ओलसर रेती आढळून आली.
या रेतीची वाहतूक करण्यासाठी चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचे स्पष्ट झाले. शासनाचा महसूल बुडवून अवैध रेती चोरी व वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई केली.
जप्त केलेला मुद्देमाल:
१) महिंद्रा ट्रॅक्टर व ट्रॉली: किंमत अंदाजे ७,००,००० रुपये.
२) अवैध रेती (१ ब्रास): किंमत अंदाजे ७,००० रुपये.
एकूण मुद्देमाल: ७,०७,००० रुपये.
यांच्यावर झाली कारवाई:
१) सौरभ प्रकाश येनुरकर (वय २७, रा. नंदपूर, ता. समुद्रपूर): ट्रॅक्टर चालक.
२) रॉयल खान पठाण (रा. सालोद हिरापूर, जि. वर्धा): ट्रॅक्टर मालक.
या दोघांविरुद्ध सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस पथक सदर कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, सावंगी मेघे ठाणेदार सहा. पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पी.एस.आय. विशाल डोणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई, निखिल फुटाणे, अक्षय मुन आणि अमोल लोणारे यांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.