भव्य जंगी शंकरपट स्पर्धेत बैतूलची जोडी अव्वल,नितीन दर्यापूरकर मित्रपरिवाराचे यशस्वी आयोजन
भव्य जंगी शंकरपट स्पर्धेत बैतूलची जोडी अव्वल,नितीन दर्यापूरकर मित्रपरिवाराचे यशस्वी आयोजन
मुख्य संपादक नावेद पठाण वर्धा
कारंजा (घा.) :नितीन दर्यापूरकर मित्रपरिवार यांच्या वतीने ता. ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान भव्य जंगी शंकरपट व कृषी प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत शहागडकर, दशरथ जाधव, संदीप भिसे, कारंजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्वातीताई भिलकर, उपनगराध्यक्ष भगवान बुवाडे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
धावपट्टीवर पहिला बैलजोड अवघ्या १४ वर्षांच्या समृद्धी चंद्रशेखर बेलखडे हिने हाकलून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चार दिवस चाललेल्या या शंकरपट स्पर्धा अ गट, ब गट आणि तालुका गट अशा तीन गटांत घेण्यात आल्या. तिन्ही गटांसाठी एकूण सुमारे ११ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. अ गटात ५०, ब गटात ७० तर तालुका गटात तब्बल १७० बैलजोडींनी सहभाग घेतला.
शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, सहकार नेते संदीप काळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख गणेश इखार, संदीप इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली.
अ गट निकाल :
प्रथम क्रमांक – निशू अन्विका राठोड (बैतूल) यांचा कॅप्टन व सेवा जोड, वेळ ८ सेकंद २ पॉईंट (रोख ₹१ लाख).
द्वितीय क्रमांक – याच मालकाचा लाइटर व चिक्या जोड, वेळ ८ सेकंद २० पॉईंट (रोख ₹७१ हजार).
तृतीय क्रमांक – कुमारी फाल्गुनी पंकज मेटांगळे (सावरगाव) यांचा भैरव व शिवा जोड, वेळ ८ सेकंद २३ पॉईंट.
ब गट निकाल :
प्रथम क्रमांक – जीएसके ग्रुप, नागपूर यांचा डेविड व अर्जुन जोड, वेळ ८.३६ (रोख ₹६१ हजार).
द्वितीय क्रमांक – एका व गोविंदा जोड, वेळ ८.३४ (रोख ₹४१ हजार).
तृतीय क्रमांक – तास खान व जागीर खान पठाण (हिवरा) यांचा देवा व सर्जा जोड.
तालुका गट निकाल :
प्रथम क्रमांक – हिमांशू मेश्राम (नांदोरा) यांचा टिकली व शेरा जोड, वेळ ८ सेकंद ९९ पॉईंट (रोख ₹५१ हजार).
द्वितीय क्रमांक – प्रफुल जाधव व जानराव मस्के यांचा सावरिया व भीमा जोड.
तृतीय क्रमांक – शेषराव धामणे (उमरी) यांचा छावा व शिवा जोड.
बक्षीस वितरण देणगीदारांच्या हस्ते करण्यात आले. चार दिवस चाललेल्या या शंकरपट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व देणगीदारांचे मुख्य आयोजक नितीन दर्यापूरकर यांनी मनःपूर्वक आभार मानले तसेच दरवर्षी अशाच भव्य शंकरपट आयोजनाचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक हेमंत बन्नगरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बांधकाम सभापती कमलेश कठाने यांनी मानले.