अल्लीपूर पोलीसांची अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर्
वर्धा:अल्लीपूर पोलीसांनी अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गुंन्हा दाखल करत ट्रॅक्टर ट्रालीसह ७,०५,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई तळेगाव टालाटूले शिवारातील नेरी नाल्याजवळ करण्यात आली. दिनांक ०६/०१/२०२६ रोजी अल्लीपूर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर पोलिस स्टाफ सह गस्तीवर असताना रात्री नऊ वाजताच्या दरम्यान त्यांना नेरी नाल्याजवळ अवैध वाळू वाहतूक संबंधाने माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी चालकाचे ताब्यातील ट्रॅक्टर ट्राली ची तपासणी केली असता ट्रॅक्टर क्र एम एच 32 पी 3629 च्या ट्राली मध्ये एक ब्रास काळी रेती विना पास परवाना अवैधरित्या मिळून आल्याने चालकाचे ताब्यातुन एकुण 7,05,000/-रु चा माल जप्त करून आरोपी चालक अनिल महादेव पाटील रा. पिपरी मेघे वर्धा व आरोपी मालक लोकेश उर्फ गप्पु विठठलराव चाफले.रा.कारला चौक वर्धा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सौरभ अग्रवाल पोलिस अधिक्षक वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक वर्धा, डाॅ.वंदना कारखेले उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव यांच्या निर्देशानुसार सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले ठाणेदार पोलीस स्टेशन अल्लीपूर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात , पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर, पो. हवा. अजय वानखेडे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र खार्डे, आकाश कुक्कडकर यांनी केली.