अल्लिपुर येथे ग्रामीण रुग्णालयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

सुनिल हिंगे ( अल्लीपुर )
हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शरद साहरे यांनी दिली आहे. शरद सहारे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे देवगिरी बंगल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन अल्लिपुर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सतिश काळे आदिसह पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे.
अल्लिपुर हे गाव हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाचा अनेक खेड्याशी संबंध आहे.मात्र याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.त्यामुळे येथिल रुग्णांना उपचारासाठी सेवाग्राम, सावगी रुग्णालयात जावे लागते तरी याठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी करण्यात आली आहे
Related News
सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी याचे पद रिक्त अवैध कामांना आले उत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष
16-Aug-2025 | Sajid Pathan
ग्रामपंचायत कार्यालय काचनगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
14-Aug-2025 | Sajid Pathan
हर घर तिरंगा अभियानांतर्गत बल्लारपूर नगर परिषदेची तिरंगा बाईक रॅली उत्साहात.
11-Aug-2025 | Sajid Pathan