धान खरेदी केंद्र सुरू करा-दिलीप घोडाम यांच्ये जिल्हाधिकारि यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी - विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी - आरमोरी तालुक्यातील शेतकरी दरवर्षी आपल्या आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी उत्पन्नात भर व्हावे या अनुषंगाने याही वर्षी नदी नाले व विहीरीवर मोटर पंप किंवा सौर ऊर्जा पंप लावून उन्हाळी धान पिक तालुक्यात मोठ्या प्रमाणात तालुक्यात लावण्यात आले असता गेल्या पंधरा-वीस दिवसापासून शेतकऱ्यांच्या धानाचे चुरणे होऊन अजूनही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्याचे धान जागोजागी रस्त्यावर घरी जागा नसल्या अभावी धान उघड्यावर पडले आहेत परंतु शासनाने अद्याप पर्यंत धान खरेदी सुरू न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्यामुळे शासनाने आधारभूत धान खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांचे धान ट्रॅक्टर भरून तहसील कार्यालयावर विक्रीसाठी आनण्यात येईल असा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा दिला आहे.गेल्या वर्षात आरमोरी तालुक्यात पावसाळी पीक धान शेतकऱ्यांनी घेतले असता अतिवृष्टीचे पुर व गोसीखुर्द धरणामुळे पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाची मोठी तनिस होऊन नुकसान झाली त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारीला समोर जाऊन उन्हाळी धान पिकात काहीतरी उत्पन्न मिळेल या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नदी नाल्यावर विहीर यांवर सौरऊर्जा कृषी पंप बसऊन व विटीया डोहच्या शहराच्या पाण्याने उन्हाळी धान पिक घेतले असता गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शेतकऱ्यांचे धान विक्रीसाठी तयार असताना अद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने आधारभूत धानखरेदी केंद्रावर क्विंटल मागे तेविशे रुपये क्विंटल च्या वर रेट असताना नाईलाजास्तव धान पिकासाठी खत औषधी मंजुरी ट्रॅक्टर चुरणा खर्चासाठी उसनवार मांगलेल्या पैसेची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना अठराशे ते एकविसशे रुपये क्विंटल प्रमाणे खाजगी व्यापाऱ्यांना विकावे लागत असुन यात शेतकऱ्यांची फार मोठी नुकसान करून विकण्याची वेळ येत आहे यात अजूनही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने अजुन ही शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होईल या आशेवर आपले धान जागोजागी रस्त्यावर घरी जागा नसल्यामुळे बाहेर पावसाच्या भितीने मेनकापड झाकुन ठेवावे आहेत परंतु शासनाने अद्याप पर्यंत धान खरेदी सुरू न केल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्यामुळे शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा शेतकऱ्यांचे धान ट्रॅक्टर भरून तहसील कार्यालयावर विक्रीसाठी आनण्यात येईल गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा दिला आहे.यावेळी भेनेश्वर अबादे कितीलाल पुराम देवनाथ झलके तुषार सेलोकर कातीक मातेरे मच्छिंद्र मेश्राम खुमा गरफडे शेलेश कुमरे महादेव खोब्रागडे प्रकाश सेलोकर बिपिन गोधोळे संकेत गोधोळे सुरेश मोहुले नितीन मने कातीक मातेरे यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते.