चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम 1ऑगस्ट ला कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 01 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11: 00 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून सिडीसीसी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.
Related News
एकपानी–तीनदाणी हरभऱ्याचा नवा वाण शेतकऱ्यांसाठी ठरतोय लाभदायक, डॉ. वसंत बोंडे यांचे अभिनव कृषी संशोधन
14-Feb-2026 | Naved Pathan
‘लालपरी संगे नाते आमुचे’ उपक्रमामुळे अल्लीपूरच्या ज्येष्ठांना देवदर्शनाचा आनंद
03-Feb-2026 | Naved Pathan
शास्त्रीय साहित्यातील भावनांची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता घेऊ शकत नाही — डॉ. देवेंद्र पुनसे
16-Oct-2025 | Sajid Pathan
आमदार उमेश यावलकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले भवनाला स्वदिच्छ भेट देत पहाणी केली
22-Sep-2025 | Sajid Pathan