कामगार दिना निमित्त महिलांचा सत्कार
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली वसमत येथे अंतर्राष्ट्रीय कामगार दिना निमित्त महिला कामगारांना वसमत येथे महाराष्ट्र सर्वोदय मंडळाच्या वतीने दि. १ मे शुक्रवारी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे महामंत्री विशाल अग्रवाल यांच्या हस्ते, "महात्मा गांधीं यांचे रचनात्मक कार्यक्रम व्यसनमुक्तीचे" पत्रक देऊन महिला कामगारांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाच्या कार्यकर्त्या शुभदा सरोदे यांनी जागतिक कामगार दिनाचे महत्त्व विशद केले. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाच्या, सर्वोदय मित्र मृण्मयी अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रारंभी, शांततेचे उगमस्थान भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस २५७० व्या जयंती निमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Related News
आरक्षण सोडतीनंतर महिला नेतृत्वाला संधी : बल्लारपूर समितीला पुन्हा महिला सभापती
04-Oct-2025 | Sajid Pathan
मकाटोला कडोतीटोला येथील महिला ग्रामसभा च्या बैठकीला मारली ग्रामसेवकांनी दांडी
13-Mar-2025 | Sajid Pathan