वसमत काँग्रेसचे निवेदन शेतकऱ्यांसाठी 5 प्रमुख मागण्या कर्जमाफी आणि दुष्काळी मदत द्या
प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथे आज तालुका व शहर काँग्रेस कमिटी वसमत च्या वतीने आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मा. उपविभागीय अधिकारी, वसमत यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात काँग्रेस कमिटीने 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत
*वोट बचाओ, देश बचाओ -* या मोहिमे अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा.
*शक्तिपीठ महामार्ग रद्द करा -* शक्तिपीठ महामार्ग रद्द करून त्यासाठीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आणि दुष्काळ निवारणासाठी वापरावा.
नियमित कर्जदारांना बोनस - नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2.00 लाख रुपयांचा बोनस देण्यात यावा.
शेतकऱ्यांना नियमित वीज द्या शेतकऱ्यांना दिवस आणि रात्रीच्या पाळीमध्ये सिंगल फेज लाईन मध्ये वीज नियमित उपलब्ध करून द्यावी.
दुष्काळी मदत जाहीर करा -नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे 1 लाख रुपये प्रति हेक्टरी मदत तात्काळ त्यांच्या खात्यावर टाकावी.
सदरील मागण्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह सय्यद उस्मान, संतोष पाटील दातेफळकर, भोजे मंगसाळे, अरविंद कठाळे, जय विजय लोखंडे, युवराज आवर आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.