अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत चे विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालय,वसमत येथे 54 वे बाल वैज्ञानिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमतच्या माध्यमिक गटात वसमत तालुक्यातून गुणानुक्रमे प्रथम क्रमांक मिळविला. या प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन साठी झाली.या प्रयोगामध्ये विद्यालयाची कस्तुरी विक्रम पतंगे, वेदिका संदीप कदम या विद्यार्थिनींनी डिजिटल सुरक्षा कवच हा प्रयोग सादर केला. त्यांना मार्गदर्शन प्रशांत जऊळकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका.सरिता शिवाजीराव पतंगे, अशोक जऊळकर, सुदाम मुळे यांचे लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. बी.डी. कदम, इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळाबाजार चे अध्यक्ष मुरलीधरराव मुळे, संस्थेचे सचिव विक्रम शिंदे, सहसचिव गजानन मुळे, संदीप कदम, मुख्याध्यापिका .सरिता शिवाजीराव पतंगे, पर्यवेक्षिका शामल शिंदे, प्रभारी प्राचार्य संध्या कातोरे,ज्येष्ठ शिक्षक एल्लाप्पा मिटकर, हरी पठाडे, शिवाजीराव पतंगे, जाधव संजय यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.