बीआयटी बल्लारपूरमध्ये स्क्रॅप टू स्मार्ट उपक्रम उत्साहात : १५५ विद्यार्थ्यांचा सहभाग
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी SCRAP to SMART – २०२६ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख प्रा. प्रशांत वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात १५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी मॉडेल प्रदर्शन आणि पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासंदर्भात नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या.
या कार्यक्रमाला CIPET, चंद्रपूरचे संचालक प्रवीण बच्छाव विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
परीक्षक म्हणून विपिन दाभेरे, नीरज बैस, सोनी ठाकूर आणि सोनल ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचे परीक्षण करून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीआयटी बल्लारपूरचे अध्यक्ष संजय वासाडे, संचालक डॉ. राजनिकांत मिश्रा, संशोधन अधिष्ठाता डॉ. झेड. जे. खान, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. सत्य नारायण चंगाला आणि पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे यांचे प्रा. प्रशांत वाळके यांनी आभार मानले. तसेच प्रा. स्नेहल बेसेकर, प्रा. श्रेयस शेंडे, प्रा. जाहिद अन्सारी, प्रा. भागवत ढेकवार यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी धनंजय पाठक, प्रतीक पाठक, मंगेश मेश्राम, शैलेश रायपुरे, चंद्रकांत टिकले आणि सुनील चमाटे यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासोबतच त्यांच्यातील तांत्रिक कौशल्ये, संघभावना आणि पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ झाली. टाकाऊ वस्तूंकडे केवळ कचरा म्हणून न पाहता योग्य तंत्रज्ञान आणि कल्पकतेच्या मदतीने त्यांचे उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करता येते, हा महत्त्वपूर्ण संदेश या उपक्रमातून देण्यात आला.