पुलगावात AIMIMची बैठक; संघटन बळकटीवर चर्चा
पुलगावात AIMIMची बैठक; संघटन बळकटीवर चर्चा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
पुलगाव : शहरात AIMIMची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी AIMIM पुलगाव शहराध्यक्ष वसीम शेख उर्फ बबलू भाई, शहर कमिटीचे पदाधिकारी तसेच विविध जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक बाबी, पक्षसंघटना अधिक मजबूत करणे तसेच पक्षाची विचारधारा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाच्या विविध उपक्रमांना अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याबाबतही कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या उपस्थितीत काही नव्या कार्यकर्त्यांनी AIMIMमध्ये प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेशी जोडले जाऊन प्रामाणिकपणे व सक्रियपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
बैठकीला AIMIM पुलगाव शहराध्यक्ष वसीम शेख उर्फ बबलू भाई यांच्यासह शहर कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध जबाबदार पदाधिकारी उपस्थित होते.