निसर्गोपचार तज्ज्ञ अफसर कुरेशी यांना ‘निसर्गोपचार गौरव’

Mon 05-Oct-2026,10:28 PM IST -07:00
Beach Activities

निसर्गोपचार तज्ज्ञ अफसर कुरेशी यांना ‘निसर्गोपचार गौरव’

प्रतिनिधि,नाजिम खान वडनेर 

वडनेर : वडनेर येथील निसर्गोपचार तज्ज्ञ अफसर कुरेशी यांना त्यांच्या निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

४ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील भातृमंडळ सभागृहात आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (एआयएमए) व योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशनच्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाला बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले, एमजीएम विद्यापीठाच्या योग विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद खरात यांच्यासह आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

अफसर कुरेशी यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.