मल्लखांबमध्ये हिरापूरच्या आदिवासी खेळाडूंची बाजी

Sat 03-Oct-2026,04:34 AM IST -07:00
Beach Activities

मल्लखांबमध्ये हिरापूरच्या आदिवासी खेळाडूंची बाजी

जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश; सलग चौथ्या वर्षी विजयी परंपरा कायम

नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा 

वर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या वतीने ज्ञानदा हायस्कूल, सातेफळ (ता. हिंगणघाट) येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२६-२७ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, हिरापूर (तळणी, ता. देवळी) येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत सलग चौथ्या वर्षी मल्लखांब क्षेत्रातील आपली विजयी परंपरा कायम राखली.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात रिमझिम सूनिचन राठोड हिने प्रथम, समृद्धी दिलीप कन्नाके हिने द्वितीय, तर राणी पुंडलिक धुर्वे हिने तृतीय क्रमांक पटकावला. मनू पवन पेंदाम हिने सहावा क्रमांक मिळविला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात रोहन पुरुषोत्तम गेडाम याने प्रथम, तर गौरव गणेश मसराम याने तृतीय क्रमांक मिळविला.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात दिव्या पुंडलिक धुर्वे हिने द्वितीय, पुनम संदीप ससाणे हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्वरा जीवनराव आत्राम हिने पाचवा, तर जान्हवी दिनेश चुलपार हिने सहावा क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य रवींद्र कुमरे याने चमकदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशस्वी खेळाडूंनी आपल्या कामगिरीचे श्रेय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी गीतांजली निकम, सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) निखिल वाघ, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विलास घोटकर, गोंडीयन रोप पोल मल्लखांब स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षा तथा रोप मल्लखांब प्रशिक्षिका कांचन पंधरे (श्रीरामे), पोल मल्लखांब प्रशिक्षक मनीष रहांगडाले तसेच क्रीडा शिक्षक गांडोळे यांच्या मार्गदर्शनाला दिले.

आदिवासी विद्यार्थ्यांनी सलग चौथ्या वर्षी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे