सेलू तालुक्यातील डिझेल चोरीचा कथित प्रकार चर्चेत
(भाग - १)
सेलू तालुक्यातील डिझेल चोरीचा कथित प्रकार चर्चेत
चोरीपासून बेकायदेशीर विक्रीपर्यंतची कथित साखळी उघड होणार?
नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा
वर्धा, सेलू तालुक्यात डिझेल चोरीच्या कथित प्रकारामुळे खळबळ उडाली असून, चोरी केलेले डिझेल बेकायदेशीररीत्या विक्री केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरी केलेल्या डिझेलची वाहतूक, साठवणूक आणि विक्री याबाबतची कथित साखळी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबतही तालुक्यात चर्चा सुरू आहे.
मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी व विक्री होत असल्याचा दावा खरा असल्यास, संबंधित प्रकार यंत्रणांच्या निदर्शनास कसा आला नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची पोलिस व संबंधित विभागांकडून सखोल चौकशी करण्यात आली आहे का, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या कथित प्रकरणात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असून, पुढील तपासात या प्रकारामागील संपूर्ण साखळी स्पष्ट होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे