कुस्तीत विभागीय स्तरावर निवड; चित्रकलेत तालुक्यात तृतीय क्रमांक
कुस्तीत विभागीय स्तरावर निवड; चित्रकलेत तालुक्यात तृतीय क्रमांक
वडनेर | प्रतिनिधी : नाझिम खान
नूतन भारत शिक्षण संस्थेच्या इंदिरा गांधी माध्यमिक तथा कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वडनेर येथील विद्यार्थिनींनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाचे नाव उंचावले आहे.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी तृप्ती किशोरराव मुळे हिने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात उल्लेखनीय यश मिळविले. तिची सन २०२६-२७ च्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी भंडारा येथे विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी देवयानी मारुती कुकुडकर हिने ‘सेवा संकल्प अभियान २०४७’ अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल २६ सप्टेंबर २०२६ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, वर्धा येथे जिल्हा परिषद, वर्धाचे शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल नूतन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी ता. महाजन, सचिव संगीता ताई कृष्णाजी महाजन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली आहे.