वसमतच्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर उपोषणाचा नववा दिवस

Fri 25-Sep-2026,12:20 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत उपजिल्हा रुग्णालयातील NQAS अंतर्गत मंजूर विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांचे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू आहे.

उपोषणाच्या नवव्या दिवशीही जिल्हा शल्यचिकित्सक, रुग्णालय बांधकाम मूल्यमापन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.

केंद्रीय मूल्यमापनात वसमत उपजिल्हा रुग्णालयाला ८२.३६ टक्के गुण मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर रुग्णालयातील विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंदाजे ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

मात्र, या निधीच्या विनियोगामध्ये आर्थिक व तांत्रिक अनियमितता झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. मंजूर कामांच्या तुलनेत प्रत्यक्ष स्थळी कामे अपूर्ण अथवा अपेक्षित कामे केली नसल्याचा, दावा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, NQAS अंतर्गत रुग्णालयाच्या सुविधांचे मूल्यमापन आणि तांत्रिक निकष तपासले जात असताना अपूर्ण किंवा कथित अनियमित कामांनंतर रुग्णालयाला ८२.३६ टक्के गुण कसे मिळाले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तसेच मॉड्युलर पीएम कक्ष, डायलिसिस सेंटरसाठी UPS, बर्न केअर सुविधा आणि इतर मंजूर कामांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

याशिवाय रुग्णालयाच्या परिसरात नवीन शवविच्छेदन कक्षाच्या बांधकामाच्या ठिकाणाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले‌ असून काय न्यायालयाच्या तोंडासमोरच सेबी छेदन कक्षाचे प्रवेशद्वार करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कामांची अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका, बिले आणि प्रत्यक्ष स्थळपाहणी यांची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.

निधीचा योग्य विनियोग झाला का? मंजूर कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली का?

या सर्व प्रश्नांची स्वतंत्र आणि निष्पक्ष तांत्रिक चौकशी करून गुत्तेदार यांना काळ्या यादीत टाकून संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे व अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश कधी देणार, याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.