वर्ध्यात AIMIM चा आक्रमक पवित्रा; चंदेलेंविरोधात आमरण उपोषण!

Thu 29-Oct-2026,07:09 AM IST -07:00
Beach Activities

वर्ध्यात AIMIM चा आक्रमक पवित्रा; चंदेलेंविरोधात आमरण उपोषण!

जाहीर माफी मागा, अन्यथा आंदोलन तीव्र करू; आसिफ खान यांचा इशारा!

नावेद पठाण | मुख्य संपादक, वर्धा

वर्धा, दि. २९ ऑक्टोबर : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहित चंदेले यांच्या कथित अरेरावीच्या वर्तनाविरोधात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून उपअभियंता रोहित चंदेले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागावी, तसेच त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनाला वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. जनतेचा सन्मान आणि न्यायासाठी हा लढा असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्याविरोधात प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आसिफ खान यांनी केली आहे.

प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आसिफ खान यांनी AIMIM च्या वतीने दिला आहे.