राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंती निमित्त विद्यार्थीनींमध्ये स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ग्रंथ वाचन

Sat 03-Oct-2026,02:53 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : हिंगोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंती निमित्त हिंगोली शहरातील विद्यार्थीनींमध्ये स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ग्रंथ वाचन प्रकल्पकाचे आयोजन महात्मा गांधी सप्ताह दि. २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले. हिंगोली शहरातील सरजुदेवी भीकुलाल भारुका कन्या विद्यालयातील निवडक विद्यार्थीनींना "महात्मा गांधी : माझी जीवन कथा" ग्रंथाचे वितरण दि. ३ ऑक्टोबर शनिवारी समर्पित सर्वोदय कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. १९४२ च्या "चले जावो" आंदोलनातील स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी आयुष्यभर गांधी तत्त्वज्ञानाचा प्रसार आणि प्रकारातील योगदानाबद्दल देखील स्मरण करण्यात आले. मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई आयोजित महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले. स्वातंत्र्यसेनानी तथा सर्वोदय विचारवंत गंगाप्रसादजी अग्रवाल ग्रंथ वाचन प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा, शांतता, सत्य, करूणा ह्या नैतिक मूल्यांची ओळख करून देण्यात आले असल्याचे समर्पित सर्वोदय कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी म्हटले आहे. ग्रंथ वाचन प्रकल्प राबविण्याबद्दल ज्येष्ठ गांधी विचारवंत टि. के. सोमय्या, प्रेमाशंकर तिवारी आदींनी कौतुक केले आहे. प्रारंभी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला खादीचा सुत्रहार अर्पण करण्यात आला.