6 वी TSRKKOI नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप 2026 मध्ये हिंगणघाटच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी; 15 पदकांची कमाई

Tue 06-Jan-2026,06:51 PM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

वर्धा : वर्धा जिल्हा मार्शल आर्ट कराटे असोसिएशन (सेल्फ डिफेन्स, वर्धा) यांच्या वतीने 6 वी TSRKKOI नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी वर्धा येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन जिहान कृष्णा ढोबळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत बी.सी.सी. स्पोर्टिंग क्लब, हिंगणघाट येथील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण 15 पदके पटकावून संघाच्या यशात भर घातली.

पदक विजेते पुढीलप्रमाणे — मोहन खाडे – सुवर्ण पदक, लावण्या मुळेवार, चारू शेंडे, माहिन पठाण, आरती नेवारे, धनश्री इरपाची, अपेक्षा किन्हेकर, ईशान साटोने, समर्थ भुसारी, रियांश पाजरे, तोहीद शेख, वरुण गांधे, साई तुमसरे – रजत पदके,

गौरव जयस्वाल – कास्य पदक.

या सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच सीनियर सेनसाई पायल पोहनकर, सेनसाई तेजस्विनी निमसरकर, कार्तिक गुर्णुले, ओंकार वैद्य, तन्मय वेल्लोर, कुणाल घोडे आणि प्रमुख प्रशिक्षक (कोच) सेनसाई नदीम शेख सर यांना दिले.

हिंगणघाटच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.