राज्यस्तरीय वूशू स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

Sun 22-Feb-2026,12:04 PM IST -07:00
Beach Activities

राज्यस्तरीय वूशू स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

 

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

 

हिंगणघाट — Maharashtra Amateur Wushu Association यांच्या वतीने आयोजित १३ वी राज्यस्तरीय सब-ज्युनियर व ज्युनियर अजिंक्यपद वूशू स्पर्धा दि. २१ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत B C C Sporting Club, हिंगणघाटच्या सात खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराचा मान उंचावला.

स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे —

तेजस्विनी निमसारकर (४५–४८ किलो, वय १६) — सुवर्णपदक

सोहम विनोद जनबंधू (४५–४८ किलो, वय १३) — सुवर्णपदक

परवेज महफूज अली (४२–४४ किलो, वय १३) — सुवर्णपदक

अंतरा सिद्धार्थ मून (४०–४५ किलो, वय १७) — रौप्यपदक

प्रांजली राजू डंभारे (४८–५२ किलो, वय १७) — रौप्यपदक

वरुण राजू गंधे (३२–३६ किलो, वय १२) — कांस्यपदक

अफाना जुबर शेख (४८–५२ किलो, वय १४) — कांस्यपदक

खेळाडूंनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. या यशामागे प्रशिक्षक नदिम शेख, उल्लास वाघ, नीलेश लाजूरकर, अभिजीत सिंग तसेच संपूर्ण कोचिंग स्टाफचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हिंगणघाट शहरातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.