राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी वीरा वॉरियर्सच्या तीन खेळाडूंची निवड!

Sat 03-Oct-2026,04:56 AM IST -07:00
Beach Activities

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी वीरा वॉरियर्सच्या तीन खेळाडूंची निवड!

प्रतिनिधी कविता बैस हिंगणघाट 

हिंगणघाट स्वरा शेखर मातकर, स्वरा घुगरे आणि अनुराग प्रमोद टिपले यांची राज्यस्तरावर झेप संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत वीरा वॉरियर्स ग्रुपच्या तीन खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. स्वरा मातकर, स्वरा घुगरे आणि अनुराग टिपले या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने वीरा वॉरियर्स ग्रुपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या यशामुळे हिंगणघाटच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रशिक्षकांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश संपादन करता आल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली.

या उल्लेखनीय यशाबद्दल वीरा वॉरियर्स ग्रुपचे संस्थापक रोहित राऊत आणि तायक्वांडो स्पोर्टस असोसिएशन वर्धा सचिव शाम खेमस्कर सर यांनी तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक गौरव खीराळे, हर्ष मून, विशाल मडावी, मयूर नगराळे आणि यश झाडे यांनीही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सदस्य रोहित खैरकार, आदिती गायकवाड, ओम बोटरे, रुचिका वानखेडे, आरोही पिसे, आस्था खैरे, सक्षम मोरे आणि सुजल बावणे यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात योग्य संधी आणि दिशा मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या वीरा वॉरियर्स ग्रुपच्या या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू हिंगणघाटचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.