हयातनगर ते खुरगाव धम्म ध्वज पद यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत

Wed 07-Jan-2026,09:15 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथे आज पुज्य भदत पय्याबोधी महास्तवीर खुरगांव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा नांदेड येथे दि:- 8 जानेवारी रोजी महाधम्मध्वज महा यात्रेचे आयोजन करणयात येत असते.

या. वर्षी वसमत तालुक्यातील हयातनगर येथील हजार बौद्ध उपासक / उपासिका यांनी सहभाग म्हणून दिन 6 जानेवारी रोजी हयातनगर ते खुररगाव येथे पदयात्रेचे आयोजन केले.वस‌मत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येचे पुज्य भदंत बुद्ध‌भुषन यांनी त्रिशरण पंचशिला प्रदान केले.या पद यात्रेत जाणाऱ्या उपासक / उपासीका यांना बालाजी नामदेवराव, शिवभगत, भगवान नामदेवराव व यशवंतराव उबारे यांनी भोजनदान दिले.

या कार्यक्रमाला नगरसेवक राजकुमार एगंडे, प्रा. सुभाष मस्के, श्रीरंग थोरात. भिमा कांबळे सरपंच, राजु एगंडे सरपंच, गोरख एगंडे, आनंदराव करवंदे, आनंद खरे, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भिम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजय‌कुमार एगंडे यांनी केले.