विरा स्पोर्टिंग क्लबच्या पाच ज्युदोपटूंची सुवर्ण कामगिरी

Mon 05-Oct-2026,10:34 PM IST -07:00
Beach Activities

विरा स्पोर्टिंग क्लबच्या पाच ज्युदोपटूंची सुवर्ण कामगिरी

राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी पाचही खेळाडूंची निवड

प्रतिनिधी : मंगेश लोखंडे, हिंगणघाट

हिंगणघाट : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या वतीने ३ ऑक्टोबर रोजी देवळी येथील खासदार रामदास तडस स्टेडियममध्ये विभागीय ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विरा स्पोर्टिंग क्लब, हिंगणघाट येथील १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील पाच ज्युदोपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीच्या जोरावर पाचही खेळाडूंची आगामी राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजयी खेळाडूंमध्ये भावेश भुते, गणेश गुंज्जेवार, पायल इंगळकर, वैष्णवी बनसोड आणि मंथन भुते यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी विभागीय स्पर्धेत कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन करत सुवर्णपदक मिळवले. आता हे पाचही खेळाडू राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या यशाबद्दल विरा स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक अजय मुळे, मार्गदर्शक अनिल जवादे, प्रशिक्षक बबलू जवादे यांच्यासह राम मेश्राम, संजु भुते, पोहणकर, योगेश झापे, अजय शेराम, श्याम इजमुलवार, अनिल मुन, केशव दोडके, राहुल घोटकर, हेमाताई दुरबुडे, सुमित हिंगे, रवी दुरबुडे, किशोर मुळे, संदिप भजभूजे, नवनाथ भुषनेश्वर, प्रेम जवादे, सौरभ डहाळकर, रमण शेराम, भुषण तराळे, प्रतीक तराळे, रोहित मुळे, सुधांशु धोबे, गोलु पाल, अनुष्का सोमलवार, तनिष डभारे, अजिंक्य सूर्यवंशी, पल्लवी मुडे आणि मानसी शेराम यांच्यासह पदाधिकारी व शिक्षकवृंदाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झालेल्या पाचही खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.