जीटी एक्सप्रेसच्या मागील डब्याला भीषण आग

Tue 17-Feb-2026,05:34 AM IST -07:00
Beach Activities

जीटी एक्सप्रेसच्या मागील डब्याला भीषण आग

वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसुफ पठाण

वर्धा : सिंदी रेल्वे स्टेशन ते तुळजापूर रेल्वे स्टेशन दरम्यान धावणाऱ्या जीटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12616) च्या मागील डब्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली असून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.