संत सेवालाल महाराज यांची 287 वी जयंती साजरी.
प्रतिनिधी :अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथे श्रीनगर,वसमत या ठिकाणी संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी. आर. पवार हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून .कन्हैया बाहेती नगर परिषद वसमतचे नगरसेवक रेणुका पतंगे, नगरसेवक राजकुमार एंगडे, धनंजय गोरे सचिन दगडू, नगरसेवक तसेच . विठ्ठल पवार, गुलाब जाधव, . गोविंद राठोड, उपस्थित होते
या कार्यक्रमात बंजारा समाजातील डाॅ.रुपेश रोहिदास पवार, डॉ .प्रतीक्षा विलास जाधव, डॉ. अभिषेक विलास जाधव आणि अश्विनी उत्तम पवार या विद्यार्थिनीची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर व्हि.के. जाधव, हरीश नवघरे यांनी प्रकाश टाकला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कैलास राठोड, निलेश जाधव वैभव चव्हाण, आनंद राठोड यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ज्योतीराम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर समाज बांधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.