आर्वीतील शाहरुखची वाघडोह पथ्रोट येथे निर्गुण हत्या ; स्वयंशास्पद आरोपींना पथ्रोट पोलिसांनी घेतले ताब्यात

Sat 14-Feb-2026,02:33 AM IST -07:00
Beach Activities

आर्वीतील शाहरुखची वाघडोह पथ्रोट येथे निर्गुण हत्या ; स्वयंशास्पद आरोपींना पथ्रोट पोलिसांनी घेतले ताब्यात

वर्धा जिल्हा विशष प्रतिनिधि युसूफ पठाण

 आर्वी : पो.स्टे. पथ्रोट येथे दिनांक ११/०२/२०२६ रोजी तक्रारदार ASI रविंद्र रामभाउ शिंपी ब.नं ५८४ वय ५१ वर्ष, पो.स्टे पथ्रोट यांनी तक्रार दिली की, ते दिनांक १०/०२/२०२६ रोजी चे २३.०० वा.पासुन ते दि.११/०२/२०२६ चे ०९.०० वा.पावेतो पो.स्टे. पथ्रोट येथे डिओ अधिकारी म्हणुन डयुटीवर हजर असतांना पो. स्टे पथ्रोट येथे ०९.०० वा. ग्राम वाघडोह येथील पोलीस पाटील श्री. सुभाष काकड यांनी फोनव्दारे माहीती दिली कि, वाघडोह ते खोडगांव रोडवरील मारुती जहानपूर शेत शिवारात एक अनोळखी इसमाचे प्रेत जाळुन टाकलेले आहे. अशा माहीती वरुन त्यांनी प्रभारी अधिकारी साहेब, पोलीस स्टेशन पथ्रोट यांना माहीती देवुन घटनास्थळी जावुन पाहीले असता त्यांना खोडगांव रोडवरील मारुती जहानपूर शेत शिवारातील धरणाचे कॅनल मध्ये एक अनोळखी मानवी जातीचे प्रेत जळाल्या स्थितीत दिसुन आले व कॅनल जवळील कच्या रोडवर चारचाकी वाहनाचे टायरचे निशान दिसुन आले. आजुबाजुला सदर अनोळखी प्रेता बाबत विचारपुस केली असता सदर अनोळखी प्रेतास कुणीही ओळखले नाही वरुन सदर अनोळखी इसमास कुणीतरी अज्ञात आरोपीने दुसऱ्या ठिकाणी जिवानिशी ठार मारुन त्याची ओळख पटु नये याकरीता त्यास चारचाकी वाहनाने आणुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जहानपूर शेत शिवारातील धरणाचे कॅनल मध्ये आणुन जाळून टाकले अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. पथ्रोट येथे अपराध क्रमांक ३२/२०२६ कलम १०३ (१), २३८ भा.न्या.स.चा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक सा. अमरावती ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे करीता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण, पो.स्टे. पथ्रोट, अंजनगाव सुर्जी यांना सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने उप.वि.पो.अ.श्री. मनीष ठाकरे सा.यांनी स्था.गु.शा.सह यांनी पो.स्टे. पथ्रोट, रहीमापुर, अंजनगांव सुर्जी येथील गुन्हे पगटीकरण पथक गठीत करुन सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना पथकांना मिळालेल्या उपलब्ध तांत्रीक पुराव्या वरुन तसेच गोपनीय माहीती वरुन दिनांक ११/०२/२०२६ रोजी चे रात्री दरम्यान अंजनगांव सुर्जी येथे राहणारा पदमश्री हॉटेल मालक शुभम रॉय हा त्याचे पांढऱ्या रंगाचे गाडीने त्याचे हॉटेवरील काम करणाऱ्या इसमांसह रात्री दरम्यान खोडगांव रोडने संशयीतरित्या ये जा करतांना दिसला वरुन पदमश्री हॉटेल मालक शुभम रॉय यास विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यानंतर त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देत सांगीतले कि, त्याचा आर्वी जि. वर्धा येथे राहणारा मामे भाऊ टिंकेश महाजन याचे वडील प्रशांत महाजन याला यातील मृतक

शेख शाहरुख शेख रऊफ याने पैशाचे कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण केली होती. वरुन आरोपी प्रशांत महाजन त्यांचा मुलगा आरोपी टिंकेश व त्याचा मित्र अली अजगर रा. आर्वी यांनी मिळुन मृतक शाहरुख याला जिवाने मारण्याचा कट रचला व त्याप्रमाणे अली अजगर याने शाहरुख यास पैशाचे आमीश देवुन सदर प्रकरण आपसात मिटवु असे सांगुन गावाबाहेर आणले त्यानंतर आरोपी टिकेश व अली अजगर याने मृतक शेख शाहरुख यास मारहान करुन जिवाने ठार मारले व मृतक यास टिकेश ने आणलेल्या चारचाकी वाहनात टाकुन आर्वी येथुन निघुन त्याचा मामे भाऊ शुभम रॉय रा. अंजनगांव सुर्जी यास लेहगांव जि. अमरावती येथे बोलावुन मृतक याचे प्रेत विल्हेवाट लावणे कामी शुभम यास लेहगांव येथे दिले वरुन शुभम ने सदर चे प्रेत हे लेहगांव येथुन स्वतःचे महीन्द्रा एक्स.यु.व्ही गाडीत आणुन त्याचे हॉटेल वर काम करणारे त्याचे तिन साथीदार यांचे मदतीने शहानुर धरणाचे कालव्यात जाळले. व तेथुन निघुन गेले अशा आरोपीच्या कबुलीवरुन गुन्हयातील इतर आरोपी १) टिकेश प्रंशात महाजन वय २८ वर्ष रा. गणपती वार्ड आर्वी जि. वर्धा २) प्रंशात हरीचंद्र महाजन वय ५९ वर्ष रा. गणपती वार्ड आर्वी जि. वर्धा ३) अली अजगर सब्दर हुसेन वय २८ वर्ष रा. जाजु वाडी आर्वी जि. वर्धा ४) हर्षीत प्रकाश गौर वय १९ वर्ष भोईपुरा बुधवारा अंजनगांव सुर्जी ५) निखील दिपचंद गौर वय ३२ वर्ष रा.भोईपुरा बुधवारा अंजनगांव सुर्जी यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यामध्ये आणखी एक विधीसंघर्षीत बालक असुन आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेले एक पांढऱ्या रंगाची महीद्रा एक्स.यु.व्ही ५०० किं.अं.५००,०००/-रु तसेच ०७ मोबाईल किंमत ७०,०००/-रु असा एकुण ५,७०,०००/-रु चा मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीतांना व विधीसंघर्षीत बालक यास पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. पथ्रोट येथे देण्यात आले आहे. पुढील तपास पो.स्टे. पथ्रोट हे करीत आहे.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा, श्री.मनीष ठाकरे सा.उप.वि.पो.अ. अंजनगांव सुर्जी यांचे मार्गदर्शनात पो.नि.श्री.किरण वानखडे स्था.गु.शा. अमरावती ग्रामीण पो.नि.श्री.सुरज बोंडे पो.स्टे. अंजनगांव सुर्जी यांचे नेतृत्वात स.पो.नि.अनंत वडतकर प्रभारी अधिकारी रहीमापुर, अभय चौथनकर प्रभारी अधिकारी पथ्रोट, व स्टाफ, स.पो.नि. सचिन पवार व पथक, पो.उप.नि. सागर हटवार व पथक, नितीन इंगोले व पथक स्था.गु.शा.अमरावती तसेच अंजनगांव सुर्जी येथील गुन्हे पगटीकरण पथक तसेच सायबर पोलीस स्टेशन अमरावती येथील विकास अंजीकर, सागर धापड यांनी केली आहे.