डॉ. भूषणकुमार उपाध्याय प्रेरणादायी व्यक्तिमत्व : पोलिस अधीक्षक अनुराग जैन

Sun 28-Sep-2025,12:31 AM IST -07:00
Beach Activities

नावेद पठाण मुख्य संपादक 

.पू. स्वामी सत्यभक्त जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

वर्धा : कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिस खात्याचे प्रमुख कार्य असले तरी न्याय आणि सत्याच्या आधारावर शासकीय व सामाजिक सेवाकार्याची जबाबदारी पोलीस विभाग कसोशीने पार पाडतो. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा बिमोड हे ध्येय जोपासताना, त्याचबरोबर सामाजिक उद्बोधनाची जपणूक करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. भूषणकुमार उपाध्याय, असे प्रतिपादन वर्ध्याचे पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी व्यक्त केले.

ते शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना प.पू. स्वामी सत्यभक्त जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना बोलत होते.

यावेळी साहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत उदगीकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, स्वामी सत्यभक्त यांचे नातू विजय सत्यम, ज्येष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल, अॅड. इब्राहीम बख्श आजाद, उपविभागीय अभियंता विजय नाखले, प्रा. यशवंत मुल्लमवार, दिलीप चिंचमलातपुरे, राजू लभाणे, गुड्डू शर्मा, सुरज बोदिले, पल्लवी बोदिले, कु. फिजा खान आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रस्तावना करताना इमरान राही म्हणाले की, “डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या शासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव, नैतिक स्वआचरण आणि सकारात्मक दृष्टीकोन यांच्या जोरावर सामाजिक उद्बोधनाचा घेतलेला वसा सर्वांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.”

पुरस्कार स्वीकृतीवेळी डॉ. उपाध्याय म्हणाले की, “मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले, मात्र प.पू. स्वामी सत्यभक्त यांच्या नावाने दिला जाणारा हा जीवन गौरव पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब असून जीवनातील आनंदाचा क्षण आहे.”

कार्यक्रमात स्वामी सत्यभक्त यांचे नातू विजय सत्यम व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. उपाध्याय यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रस्तावना इमरान राही यांनी केली, संचालन मोहन मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय सत्यम यांनी मानले.