शिवजयंती निमित्त दिलीप राठी यांचा संविधान प्रत देऊन सत्कार

Sat 21-Feb-2026,01:15 AM IST -07:00
Beach Activities

शिवजयंती निमित्त दिलीपभाऊ राठी यांचा संविधान प्रत देऊन सत्कार

नावेद पठाण मुख्य संपादक 

कारंजा (घाडगे) बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, कारंजा (घा.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती तसेच योग तरंग ग्रुप, विठ्ठल टेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कारंजा (घा.) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मराठा सेवा संघ, वर्धा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष अंधारे, बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे सचिव तथा माजी प्राचार्य प्रेमदास मोहोड, सत्कारमूर्ती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपभाऊ राठी तसेच माजी मुख्याध्यापक विलास वानखडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. दिलीपभाऊ राठी यांनीही शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवरायांना आदरांजली अर्पण केली.

शिवजयंतीचे औचित्य साधून दिलीपभाऊ राठी यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेमदास मोहोड यांनी गीताच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे कार्यवाह अशोक नागले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष श्रीरामजी इंगळे, दुर्गाताई कांबळे, रामदास तायडे आदींनी सहकार्य केले.