जि. प. उच्च प्राथमिक शाळा, काचनगांव येथे 'संविधान दिन' उत्साहात साजरा

Sat 28-Nov-2026,12:54 AM IST -07:00
Beach Activities

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लीपूर

 

काचनगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कुरटकर सर , शिक्षकवृंद मोघे सर, धुर्वे सर मांढरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतिश अं कापसे व सर्व सदस्य विध्यार्थी उपस्थित होते मार्गदर्शन .. 

या विशेष दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी व उपस्थित सर्वांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे (उद्देशिकेचे) सामूहिक वाचन केले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व, तसेच नागरिक म्हणून असलेले आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. लोकशाही मूल्ये जपण्यासाठी प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक काकडे सरांनी केले.