आंतरराष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या संघांना सुवर्णपदक शेख सरफराज यांचा सत्कार संपन्न.
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत येथील लकी स्पोर्टिंग क्लबचा खेळाडू शेख सरफराज याने भारतीय बॉल बॅडमिंटन संघात इंडोनेशियातील बाली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय बाल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करत नुकताच हिंगोली जिल्ह्यात पुनरागमन केले त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे
या यशाबद्दल बॉल बॅडमिंटन फेडरेशन ऑफ इंडियाचे लेव्हल सेक्रेटरी श्रीराजा राव व महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी अतुल इंगळे यांनी खेळाडूचे विशेष कौतुक करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लकी स्पोटिंग क्लबचे सचिव शेखनूर अध्यक्ष लक्ष्मीकांत नवघरे सचिव शेखनुर,शेख जब्बार, विजय कुदाळे, सुनील मालवटकर, सय्यद युनूस ,शेख इजाज ,केदार कहाळेकर, मुग्धा कहाळेकर ,शेख हमीद व संजय उबारे या सर्व सदस्यांनी सरफराज चा यावेळी सत्कार केला.