संत गाडगेबाबांनी "नैतिक-सामाजिक" ठसा उमटविला दीडशे वी जयंती
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथे "चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,उघड्या-नागड्यांना वस्त्र घ्या,तहानलेल्यांना पाणी द्यावे,भुकेल्यांना अन्न द्या,व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, अंध-पंगू-रोग्यांना औषधोपचार करा, दु:खी निराशांना हिंम्मत प्रदान करा,जातिभेद, अस्पृश्यता पाळू नका" देव दगडात नसून तो माणसांत आहे" संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनपर उपदेशात नैतिक-सामाजिक ठसा उमटविले.नशामुक्त भारत अभियान अंतर्गत, नशामुक्त भारत अभियान समिती,नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, गंगाप्रसादजी अग्रवाल सर्वोदय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनकार गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंती निमित्त दि. 23 फेब्रुवारी सोमवारी अभिवादन करण्यात आले.व्यसनांचे थेट परिणाम समाजातील विविध पातळीवर निदर्शनास येतात, प्रमुख्याने मद्यपी इसमाच्या कुटुंबातील महिला, मुलाबाळांना दुष्परिणाम सोसावे लागतात. शिक्षण, आरोग्य, सामाजिक असुरक्षितता असे नानाविध प्रश्न निर्माण होतात, ते केवळ एका व्यसनाधीनतेमुळे. सभोवतालच्या परिसरात देखील त्रेधातिरपिट निर्माण होते. अशांतता निर्माण होते म्हणून, मुलाबाळांना-स्त्रियांना व्यसनांपासून होणाऱ्या जाचातून सुटका मिळवून देण्यासाठी मद्यपिला बडवा, पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करा असा सल्ला संत गाडगे महाराज समाज प्रबोधनातून देतात. प्रबोधनकार गाडगेबाबा यांच्या विचारांची आवश्यकता आहे. शैक्षणिक-सामाजिक पातळीवर संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंती निमित्त वैचारिक मंथन करण्याची आवश्यकता सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.