बेल्ट वितरण व मेडलिस्ट विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत येथील मास्टर सोमनाथ हेगु मास्टर संभाजी कुसळे यांच्या आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय मेडलिस्ट विद्यार्थ्यांचा व कलर बेल्ट वितरणाचा कार्यक्रम श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर समोर सुवर्णकार कॉलनी येथे घेण्यात आला.,
यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.आय.सुधीर वाघ (शहर पोलीस स्टेशन वसमत,)
प्रमुख पाहुणे -डॉ. रेणुका पतंगे शिवसेना नगरसेवक,आर . बी .सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी,काजल शिरसाट मॅडम,मास्टर कपिल रोकडे,अरविंद जाधव सर योगगुरु, गणेश सरदेशपांडे सर, महेश जोशी सर, प्रसाद निंबाळकर सर गरुड सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात मेडलिस्ट विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी 3-4 महिने प्रॅक्टिस करून बेल्टच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना येल्लो बेल्ट,ऑरेंज बेल्ट,ग्रीन बेल्ट, रेड बेल्ट वितरण करण्यात आले. यामध्ये सानवी गाडे,अनुष्का देसाई, वैदई भोसले, वेदश्री भोसले, जयेश हेगु, निसर्ग बनसोडे,विश्वजीत गुळगुळे, प्रज्ञा खरे, संस्कृती चंदेल ,राणा राजवीर चंदेल,वरद भोसले,सार्थक दहिवाळ,आथश्री डहाळे,शर्व गुंडले, गुंजन कार्ले, अद्विता अंभोरे, शिव कोकाने, पायल चव्हाण, वैभवी लोंढे, संस्कृती चोपडे, रोहन थोरात, श्रीशा कुलकर्णी, गार्गी कोठुळे या विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कतास पावरफुल करत व नॉन चोक, स्टिकचे थरारक मोमेंट करत प्रमुख पाहुण्यांचे व उपस्तिथ पालकांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरुड सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राची खरे या विद्यार्थिनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मास्टर सोमनाथ हेगु, संभाजी कुसळे, मास्टर पंकज मगर, मास्टर आकांक्षा दवणे, तर सीमा पाठक, सचिन सर दहिवाळ, बालाजी गाडे सर,मास्टर सोहम धोंडे, श्रेयश हेगु सुवर्णा जाधव, पायल चव्हाण, संध्या शिरसागर,रिया क्षीरसागर यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.