मास्टर सोमनाथ हेगु यांच्या कराटे क्लास मधील विद्यार्थ्यांनी 32 मेडलची कमाई करत मारली बाजी

Thu 22-Jan-2026,04:04 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत अनसिंग वाशीम येथे झालेली सातवी माँ साहेब जिजाऊ चषक खुली राज्यस्तरीय स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील मास्टर सोमनाथ हेगु मास्टर संभाजी कुसळे मास्टर आकांक्षा दवणे यांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी काता व कुमिते या दोन प्रकारात 32 मेडल ची कमाई केली यामध्ये 10 गोल्ड मेडल, 8 सिल्वर मेडल, 14 ब्रांच मेडल,ची कमाई करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला यामध्ये पायल चव्हाण, संस्कृती चंदेल, गुंजन कार्ले, आथश्री डहाळे, अनुष्का देसाई, गार्गी कोटुळे, सानवी गाडे, वैभवी लोंढे, प्रज्ञा खरे, जयेश हेगु , राणा राजवीर चंदेल, वरद भोसले, विश्वजीत गुळगुळे, सार्थक दहिवाळ, शर्व गुंडले, निसर्ग बनसोडे या सर्व विद्यार्थ्यांनी अतिथटीच्या सामन्यात यशस्वीरित्या यश प्राप्त करून राज्यात हिंगोली जिल्ह्याने तिसऱ्या क्रमांक पटकावला त्याबद्दल सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.