नागठाणा येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन; आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
नागठाणा येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन; आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
नावेद पठाण मुख्य संपादक
नागठाणा, दि. २१ फेब्रुवारी २०२६ — नागठाणा (ता. देवळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज उत्साहात पार पडला. राजेश बकाने (देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते विधीवत भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला रोठा येथील राणू माता देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय चौधरी, रोठा व नागठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रेखाताई ठाकरे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश लोहकरे, सौ. कीर्ती मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेंद्र भाऊ मेंढे उपस्थित होते.
नागठाणा शिक्षण व क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष प्रा. प्रविण सराटे व सचिव श्री. श्याम वलके यांच्यासह ग्रामस्थ व इतर मान्यवरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी नागठाणा शिक्षण व क्रीडा प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि नागठाणा क्रीडा व शिक्षण जनजागृती विद्यार्थी विकास उपक्रम व संघर्ष समिती, वर्धा यांच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या “क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मारक” परिसराचे सौंदर्यीकरण व समाजभवन उभारणीबाबत आमदारांना निवेदन देण्यात आले.
गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी या कामांना गती देण्याचे आश्वासन यावेळी आमदार बकाने यांनी दिले. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले.