पडेगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खननाचा धुमाकुळ | प्रशासन मौन ?

Sun 22-Feb-2026,11:49 AM IST -07:00
Beach Activities

पडेगाव नदीपात्रात अवैध रेती उत्खननाचा धुमाकुळ | प्रशासन मौन ?

कारवाई नेमकी कुठे अडकते आहे? आणि प्रशासनची हाताची घड़ी तोडाचा बोत कधी हटनार ?

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

वर्धा — सावंगी मेघे परिसरातून अवैध रेती उत्खननाचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पडेगाव नदीपात्रात दिवसाढवळ्या रेती तस्करी सुरू असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातून उघडपणे रेतीची वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. सूत्रांच्या माहितीनुसार, पडेगावसह सालोड परिसरातील काही रेती तस्कर या भागात सक्रिय असल्याची चर्चा असून, त्यामुळे त्यांच्या मनोबलात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत विचारले आहे, “सामान्य नागरिकाने किरकोळ नियमभंग केला तरी तात्काळ कारवाई होते; मग इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेती तस्करीकडे दुर्लक्ष का केले जाते?” काही नागरिकांनी रेती माफिया व प्रशासन यांच्यात संगनमत असल्याचीही चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे.

अवैध उत्खननामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भविष्यात पाणीटंचाई तसेच नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेती तस्कर प्रशासनालाच उघडपणे आव्हान देत असल्याचे चित्र दिसत आहे.

पडेगाव नदीची लूट थांबणार कधी? प्रशासन ठोस कारवाई करणार की मौन बाळगणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.