वाढत्या गुन्हेगारीच्या काळात कराटे खेळ महत्त्वाचे : इमरान राही
वाढत्या गुन्हेगारीच्या काळात कराटे खेळ महत्त्वाचे : इमरान राही
नावेद पठाण मुख्य संपादक
वर्धा. स्वसंरक्षण, शारीरिक क्षमता वाढवणे आणि मानसिक शिस्त विकसित करणे हे कराटे खेळातील तीन मुख्य उद्देश आहे. या खेळामध्ये लवचिकता, संतुलन, शक्ती आणि वेग वाढतो. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. कराटे केवळ शारीरिक नाही तर मानसिक खेळही आहे. हे आत्मविश्वास, संयम, शिस्त आणि आदराची भावना विकसित करते. देशात लहान मुला मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झालेली आहे. वर्धा नगरपरिषदेच्या सक्षम नगरसेविका तथा माजी महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई भुते यांच्या आश्रयात अशे प्रशिक्षण केंद्र चालतात ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु गुन्हेगारीच्या काळात कराटे फार महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही यांनी व्यक्त केले.
ते दिनांक 22 फेब्रुवारी ला सायंकाळी सर्वसेवा संघ लेआउट, रामनगर वर्धा येथे स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संलग्नित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित "विद्यार्थ्यांच्या गुणगौरव" सोहळाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून नगरसेविका वंदना भुते, प्रमुख अतिथी म्हणून स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, सभासद निखिल सातपुते, ऊशु स्पोर्ट असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश राऊत तर मुख्य मार्गदर्शक म्हणून स्पोर्ट शोतोकान कराटे - डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्ह्याचे सचिव शिहान मंगेश भोंगाडे, चॅम्पियन टीमचे कॅप्टन सेन्साई कार्तिक भगत प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
नगरसेविका वंदना भुते म्हणाल्या की कराटे हा आज ऑलिंपिक स्तरावर खेळला जाणारा एक शिस्तबद्ध आणि संरक्षणात्मक खेळ आहे. याचा शासकीय व निमशासकीय भरतीमध्ये 5% खेळाडूंच्या आरक्षणाचा फायदा होऊन खेळाडूंनी आपले जीवन घडवले पाहिजे. याप्रसंगी मोहन मोहिते, निखिल सातपुते, निलेश राऊत, मंगेश भोंगाडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते तीर्थ उमेश दरणे, स्वानंदी विवेक सौरकर, शरयु शेखर येंगडे 1st क्यू ब्राऊन बेल्ट, शुभ्र शरद भगत, मानवी विनय रोठोड, माही विनय रोठोड 2nd क्यू ब्राऊन बेल्ट, मानव शांताराम कडू 5th क्यू ब्ल्यू बेल्ट, दुहिती आशिष तोटे, अश्वत्य शिजिथ अळीकल, काव्या रवींद्र वाटकर, आर्यन नितेश सुटे, निवेदिता प्रकाश इरपाते, ग्रीन बेल्ट नवीन संजय वितोंडे, गुणश्री रणवीर वरहारे, रोमिशा मनोज वाघमारे, हर्षवर्धन महिस्कर 7 th क्यू ऑरेंज बेल्ट, पूर्वा संदीपजेंगते, श्रावणी अमोल देवगिरीकर, श्रीनंदन अमोल देवगिरीकर, अवनी पवन पाचे, करणवीर महावीर वारहरे, गोरक्ष निरज डहाके 8 th क्यू येलो बेल्ट यांना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन रामनगर शाखाप्रमुख सेन्साई पूजा गोसटकर यांनी केले. प्रस्तावना देवांशू लाखे व पियूष सिंग, संचालन शरयू येंगडे तर आभार वाणी साहू यांनी मानले.