प्रतिकात्मक व्यसनांची होळी नशामुक्त भारत अभियानाचा उपक्रम

Mon 02-Mar-2026,08:41 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली:वसमत येथे आज जवाहर विद्यालय वसमत या ठिकाणी,तंबाखू, गुटखा, विडी, सिगार, खर्रा, व्हाईटनर आदी व्यसनांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत, नशामुक्त भारत अभियान समिती, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, येथील जवाहर विद्यालयात होळी आणि रंगपंचमीच्या औचित्याने व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी प्रतिकात्मक होळी करण्यात आली. नशामुक्त भारत अभियान समितीचे जिल्हा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विशाल अग्रवाल, मुख्याध्यापिका एस. एस. जोशी, सहशिक्षक एस. जी. देशमुख, एस. पि. देवरे, एम. एस. पाठक, पि. पि. शास्त्री, एम. बी. शिंदे, श्डि. पि. अडसिरे, एन. एन. थोरात, ए. एस. आझादे, एस. एस. कालेकर, . बि. एस. लाखाडे, . जि. एस. साबणे, एस. आर. मांदळे आदींची उपस्थिती होती. सण उत्सव साजरा करतांना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी होळीमध्ये विविध प्रकारचे प्रतिकात्मक व्यसनवर्धक पदार्थांचे दहन विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद करणाऱ्या फलकाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.